ASAE

ASAE
AnSaAaEv in Wonderland

Saturday, May 7, 2016

मॉम्मी, मी काय करू? भाग 3

मॉम्मी, मी काय करू?

भाग 3
किचनमधे काम करताना मॉम्मी अनुष्का आणि डॅडीचं बोलणं ऐकतच होती आणि गालातल्या गालात हसत होती. तेवढ्यात तिला अनुष्काचा फोन आला.


“हॅल्लो, पॉवरिंग परी बोलतेय का? मी अनुष्का बोलतेय.”
“हॅल्लो, मी पॉवरिंग.” मॉम्मी म्हणाली. “हाय्‌ अनुष्का. तुझं माझ्याकडे काही काम होतं का?” मग दोघी बराच वेळ फोनवर बोलल्या आणि त्यांनी दुसर्‍या दिवशी दुपारी भेटायचं ठरवलं. 

दुसर्‍या दिवशी सकाळी मॉम्मीचा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झाल्यावर मॉम्मीनं आणि अनुष्कानं मिळून प्लॅनिंग केलं.
मॉम्मी म्हणाली, “तू सुट्टीत काय काय करणार? आधी आपण लिस्ट करू. मग केव्हा काय काय करायचं त्याचं प्लॅनिंग करू.
अनुष्का म्हणाली, “मी ... चित्रं काढणार, ‘Angel of Annunciation’ काढणार. नाहीतर ‘Starry Night’ काढू का?”
मॉम्मी म्हणाली, “अगं असं एकदम तसं चित्र काढता येत नाही. आधी साधी, छोटी छोटी चित्रं काढता यायला हवीत, खूप प्रॅक्टीस करायला हवी. मी तुला शिकवीन. तू कशाचं चित्र काढशील?
अप्पू हत्तीचं, आणि सफरचंदाचं, लॅपटॉपचं, टेडीचं, ग्रोगोर वाघोबलाचं.
ठीक आहे. आणखी काय करणार?
आजीकडून तिच्यासारखी पुरणपोळी आणि मट्न् बिर्याणी करायला शिकणार.
मॉम्मी म्हणाली,एकदम पुरणपोळी आणि मटन्‌ बिर्याणी करायला येत नाही. आधी छोटे-छोटे, सोपे सोपे पदार्थ करायला आजी आणि मी तुला शिकवू. काही वर्षांनी मग जरा अवघड पदार्थ आणि नंतर पुरणपोळी आणि बिर्याणी शिकायची. 
 अनुष्का म्हणाली, ओ.के. ... पण टीचर म्हणाल्या की हेल्दी फूड खायला हवं. मला हेल्दी पदार्थ करायला शिकवशील?
मॉम्मी म्हणाली, होऽऽ, अर्थातच! नेहमी हेल्दी पदार्थच खायला हवेत. ते मी आणि आजी तुला नक्कीच शिकवणार.”
आणि सिंथवर माझ्या आवडीची गाणी वाजवायला मी डॅडीकडून शिकणार. मी मोझार्ट’ वाजवणार, किंवा तारीफ करू क्या उसकी’ वाजवणार.
अगं, पण ...
ओ.केऽऽ! आधी मी सिंथवर सा, रे, ग, म’ वाजवायची प्रॅक्टीस करणार, मग सोपी सोपी गाणी वाजवणार, मग अवघड गाणी आणि मग वेस्टर्न आणि इंडियन क्लासिकल.
पण हे 2 महिन्यांत होणार नाही.”
“मला माहिती आहे. त्याला 12 वर्षं लागतात. पण मी आता सुरुवात करणार.”
ठीक आहे.
आणि मी आबांकडून पोहायला शिकणार, खूप पुस्तकं वाचणार आणि गाणी ऐकणार.
ठीक आहे.
आणि मालविका आत्याकडे जाऊन मी एक मोठ्ठा प्रोजेक्ट करणार.
पण त्यासाठी आत्ता सॅन्फ्रॅन्सिस्कोला जाता येणार नाही. त्यापेक्षा आपण इथेच एक प्रोजेक्ट करू या. काय करूया बरं? ... हां! आपण पॅटर्न्स विथ कलर्ड ब्लॉक्स’ (‘Patterns with Colored Blocks’) हा प्रोजेक्ट करूया का?
वॉव्! खूपच मज्जा!! अनुष्का टाळ्या वाजवत म्हणाली. ते बघून सायाने पण टाळ्या वाजवल्या.
मॉम्मी म्हणाली, पण हा प्रोजेक्ट आपल्याला साया झोपल्यावरच करावा लागणार. नाहीतर ती ते ब्लॉक्स तोंडातच घालेल.
अनुष्का म्हणाली, चालेल. पण साया जागी असेल तेव्हा मी तिच्याशी पण खूप खेळणार. नेहमी शाळेत गेल्यावर मला तिच्याशी खेळायला वेळच मिळत नाही.
 ... आणि शिवाय आमच्या टीचरनी सांगितलं आहे की आऊटडोअर गेम्स खेळा म्हणजे तुम्हाला ताकद येईल. शिवाय सनलाईट उघड्या अंगावर पडला की शरीरात डी’ व्हिटामिन तयार होतं. डी’ व्हिटामिन आणि कॅल्शिअम’मुळे हाडं बळकट होतात. मी रोज २ कप दूध पिणार.
ते तर तू रोज पितेसच! तुझ्या टीचर म्हणजे पण ’पॉवरिंगच’ आहेत वाटतं.
“होऽऽऽ! आणि त्या सांगतात त्याप्रमाणं मी रोज एक अंडं खाणार आणि आवडत नसली तरी पालेभाजी खाणार. त्या म्हणतात पालेभाजी आणि कोणतीही भाजी आवडत असेल तर आवडून एक वाटी खायची आणि आवडत नसेल तरी न आवडून एक वाटी खायची.”  
“पण न आवडायला काय झालं? मी तर रोज छान, मजेदार पालेभाज्या बनवणार आहे. मला तर त्या खूप आवडतात. आणि आपण त्या आता आपल्या बागेत पण लावणार आहोत.”
वॉव! मग आपल्याला केव्हाही पालेभाजी बनवायची असली की सरळ बागेत जायचं आणि ताजी ताजी तोडून आणायची. मी आणि साया तोडून आणू.”
"मग तर फारच छान! पण त्याआधी आपल्याला जमीनीचे वाफे तयार करायला लागतील, रोपं लावायला लागतील, त्यांना पाणी घालायला लागेल, खतं घालायला लागतील. तुम्ही कराल मदत?”
“होऽऽ!” अनुष्का ओरडली आणि तिच्याबरोबर साया पण ओरडली.    
आणि मी कोणते आऊटडोअर गेम्स खेळू?
बागेत तर आपण काम करणारच. शिवाय आपण सायकल नाही का आणलेली?" 
वॉव! मला सायकल चालवायला खूप आवडते. आणि मला येते पण.
त्यानं तुझे पाय पण खूप स्ट्रॉंग होतील.
मी बागेतल्या ट्रॅकवर रोज 100 चकरा मारणार.
आधी २ चकरा तर मार. मग सुट्टी संपेपर्यंत हळू हळू वाढवत १०० चकरा मार.
आणखी आऊट-डोअर गेम्स कोणते खेळूया?
आपल्याला जॉगिंग, फास्ट रनिंग, स्किपिंग, पकडापकडी, फूटबॉल हे पण खेळता येईल. हे सगळं तू सायाबरोबर खेळ. म्हणजे तुला खेळायला जोडीदार मिळेल, तिलाही मजा येईल आणि ती काही गोष्टी शिकेल.”
ओ.के.
“शिवाय पोहायला तर तू शिकणार आहेसच. आता ही लिस्ट करून झाली. आता प्लॅनिंग करून टाईमटेबल बनवूया.” 
म्हणजे काय करायचं
म्हणजे, लिस्टमधल्या कोणत्या गोष्टी आधी करायच्या, कधी करायच्या आणि किती वेळ करायच्या ते ठरवायचं; आपल्याला किती वेळ मिळेल ते बघायचं आणि त्याचं वेळापत्रक बनवायचं.
 
मग मॉम्मी आणि अनुष्कानं मिळून रोज करायच्या गोष्टींचं आणि एकूण सुट्टीच्या २ महिन्यांत करायच्या गोष्टींचं प्लॅनिंग केलं.


_ _ _ * * * _ _ _ * * * _ _ _ * * * _ _ _ 

भाग 4पुढच्या शनिवारी

No comments:

Post a Comment