ASAE

ASAE
AnSaAaEv in Wonderland

Saturday, May 28, 2016

वळीवाचा पाऊस - गारांचा पाऊस



वळीवाचा पाऊस - गारांचा पाऊस


ढग वाजतात गडामगुडूम
छातीत होतंय धडामधूडूम
       


वीज चमकतीय लकलकलक
प्रकाश पडतोय चकाचक


सोसो आता सुटला वारा
पाऊस आला भराभरा




पावसाबरोबर हे काय आलयं?
दारातलं अंगण पांढरं का झालयं?


अरेच्चा! ह्या तर आल्या गाराचगारा
भराभरा आता गोळा करा


मुठीत गार वितळून जाई
गोळा करायची करूया घाई




पोटात जाता गारा चार
पोट झालं गारेगार



वळीवाचा पाऊस - गारांचा पाऊस


    ढग वाजतात गडामगुडूम
    छातीत होतंय धडामधूडूम
        वीज चमकतीय लकलकलक
        प्रकाश पडतोय चकाचक
    सोसो आता सुटला वारा
    पाऊस आला भराभरा
        पावसाबरोबर हे काय आलयं?
        दारातलं अंगण पांढरं का झालयं?
    अरेच्चा! ह्या तर आल्या गाराचगारा
    भराभरा आता गोळा करा
        मुठीत गार वितळून जाई
        गोळा करायची करूया घाई
    पोटात जाता गारा चार
    पोट झालं गारेगार


सुलू आजी


No comments:

Post a Comment