ASAE

ASAE
AnSaAaEv in Wonderland

Saturday, May 21, 2016

आरवचा वाढदिवस

­
          आरवचा वाढदिवस





एक आहे आरव. हा आहे त्याचा डॅडी आणि मम्मा.
     एकदा काय झालं, आरवचा होता वाढदिवस. म्हणून त्याच्या मम्माने केला मोठा ट्रेनचा केक.
मग वाढदिवसासाठी आला अप्पू हत्ती, टूनटिन हरीण, फझी ससा आणि मंकू माकड. सगळे जण जमले आणि गेले एका मस्त बागेत.  

बागेत होतं हिरवंगार गवत, रंगीत रंगीत फुलं, आणि त्यांच्यावर उडणारी छोटी छोटी फ़ुलपाखरं. ते सगळं बघून आरव आणि आरवचे दोस्त एकदम खूष झाले. अप्पू लागला झुलायला, टूनटीन लागला उड्या मारायला आणि मंकू लागला झाडावर लटकायला.
  

आरव म्हणाला, “अरे, बघा तरी मम्मानं काय काय केलं आहे. मस्त ट्रेनचा केक!त्याबरोबर अप्पू, मंकू, फझी आणि टूनटिन सगळे जण धावत आले. मग डॅडीनं आणलं एक छोटं टेबल. त्याच्यावर ठेवला ट्रेनचा केक. केक पाहिल्यावर सगळेजण म्हणालेवॉव्, काय मस्त केक आहे.”


 पण केक पाहिल्यावर अप्पू जोरात ओरडला, “ मला खूप भूक लागली आहे आता मी सगळा केक एकटा खाणार.” पण आरव म्हणाला, नाही, नाही. अप्पू असं एकट्याने खायचं नाही. मम्मा सांगते की सगळ्यांनी वाटून घ्यायचं आणि मग खायचं.डॅडी म्हणाला, “बरोब्बर. आरव, ही चांगली सवय आहे.”

  

मग मम्मा म्हणाली, “आता थांबा हं, मी केक कापते आणि सगळ्यांना देते.” मग मम्मानी केक कापला. एक तुकडा दिला अप्पूला, एक टूनटिनला, एक मंकूला, एक फझीला आणि एक तुकडा आरवला. शिवाय डॅडीने सगळ्यांसाठी आणले होते मस्त लाडू, चकली आणि अपल्स.

मग सगळे गवतावर गोल करून छान बसलेसगळ्यांनी मजेत सगळा खाऊ खाल्लामग मम्मानी मस्त गरमागरम टोमॅटोचं सूप सगळ्यांना दिलं. छान खाऊन-पिऊन झाल्यावर सगळेजण गवतावर बॉल खेळले.
सगळ्यांनी खूप उड्या मारल्या. मग अप्पूनं सगळ्यांना पाठीवर बसवून एक लांब चक्कर मारली
मग सगळे जण आपापल्या घरी गेले. आणि आरव पण मम्मा डॅडीबरोबर घरी गेला
                    समाप्त 

No comments:

Post a Comment