"अनुष्का भरभर जेव पाहू ..." अनुष्काची मम्मी अनुष्काला ओरडली. अनुष्काच्या
टंगळ मंगळ करत जेवण्यावरून तिची चिडचिड झाली होती.
"हो. जेवते गं .. "
अनुष्का म्हणाली, पण तिचे ते iPad वर गाणी, गोष्टी बघणे चालूच होते.
iPad वर बघण्याच्या नादात तिचे जेवणाकडे लक्षच नसायचे.
"अनुष्का, जर तू लवकर आणि छान जेवलीस तर मी तुला एक मस्त गोष्ट
सांगीन...". आबा म्हणाले.
आबांचे हे आमिष बरोबर लागू पडले. आणि नवी गोष्ट ऐकण्याचा
उत्सुकतेने अनुष्काने जेवण भरकन आटोपले आणि
ती आबांकडे येवून बसली.
"हं आबा, गोष्ट.. गोष्ट.. "
अनुष्काचा लकडा चालू झाला
...
“मी पण गोष्ट ऐकणार” आबांच्या पाठीवर
चढत साया म्हणाली.
“बर बाई, ये बस अशी ...
. मला सांग अनुष्का, तू जेवण्याचा असा
कंटाळा का करतेस? तुला माहित आहे का, आपण का जेवतो?
"भूक लागते म्हणून, आबाऽऽ
... " अनुष्काला हसूच आवरले नाही ... हा काय आबांचा प्रश्न झाला?
“मी पण जेवते.” साया मधेच म्हणाली.
"अग हो..., पण भूक का लागते?”
"आपण खूप खेळतो नं, म्हणून... " किंचित विचार करून
अनुष्का ने उत्तर दिले .
"अगदी बरोबर, आपण खेळतो, काम करतो, त्यासाठी
एनर्जी (energy) खर्च होते. म्हणून आपली एनर्जी
कमी होते. मग शरीर
म्हणतं, आता मला काहीतरी करून ही एनर्जी
परत मिळवायला हवी. त्याला माहिती असतं की एनर्जी अन्नात
असते. म्हणून आता खायला हवं. मग आपल्या पोटात गुरगुर होते ... म्हणजे आपलं शरीर म्हणत
असतं, अनुष्का मला खायला हवंय ... म्हणजेच आपल्याला भूक लागते. आणि हो, लहान मुलांना तर मोठं पण व्हायचं असतं, मग तर अजून अजून एनर्जी हवी असते नं... मग
खूप भूक लागते." आबांनी माहिती पुरवली..
"ती एनर्जी मिळते त्या अन्नातून... त्या अन्नाचं पचन झाल्यावर ..."
"पचन म्हणजे काय, आबा?"
“पचन म्हणजे ... आता तुला कसं सांगू? ... हं. गुंतागुंतीचे, पाण्यात
न विरघळणारे अन्नपदार्थ फोडून ते साध्या-सोप्या, पाण्यात विरघळणार्या कणांत बदलून
टाकायचे.”
“म्हणजे मिक्सरमधून काढायचे?”
“मिक्सरमधे ते फक्त खूप बारीक होतील. पण
पोळी मिक्सरमधे बारीक केली आणि त्यात पाणी घातलं तरी ती साखर किंवा मिठासारखी पाण्यात
कशी विरघळेल?”
“पण पाण्यात का विरघळायला हवी?”
“म्हणजे ती रक्तात शोषली जाऊ शकेल.”
“पण रक्तात का शोषली जायला पाहिजे?”
“पुढे गोष्ट ऐक म्हणजे ते समजेल. ... तर
... पोळीसारख्या, उसळीसारख्या. भाजीसारख्या गुंतागुंतीच्या अन्नपदार्थांना वेगळ्या
प्रकारानं फोडायचं, म्हणजे त्यांचे साखरेसारखे अगदी छोटे, साधे-सोपे, पाण्यात
विरघळणारे कण बनतील. त्याला म्हणायचं पचन. हे वेगळ्या प्रकारानं फोडायचं काम करण्यासाठी शरीर वेगवेगळे पाचक रस (Digestive juices) तयार करतं.”
“म्हणजे सगळ्या पदार्थांची साखर बनते?”
“मी साखर खाणार.” साया म्हणाली.
“नाही. अगं, अन्नात वेगवेगळे घटक असतात ... ते सर्व आपल्याला
आवश्यक असतात. … आणि त्यांचे वेगवेगळे उपयोग असतात. ... अन्नघटकांची
गोष्ट नंतर सांगीन. पण वेगवेगळे अन्नघटक फोडले की वेगवेगळे साधे पदार्थ बनतात.
उदाहरणार्थ भात-पोळीसारखे पदार्थ फोडले की ग्लूकोज (Glucose) नावाच्या साखरेचे कण मिळतात. ... आणि वेगवेगळे
अन्नघटक फोडण्यासाठी वेगवेगळे पाचक रस असतात. ...
“चिकनचं काय होतं?”
“डाळी-अंडी-चिकनसारखे पदार्थ फोडल्यावर
अमीनो असीड्सचे कण मिळतात, तेल-तूप-लोणी असे पदार्थ फोडल्यावर फॅटी-असीड्सचे कण मिळतात.
...
अनुष्काला आता जरा जरा मजा यायला लागली होती ... “हे सगळं मजेशीरच आहे. अगदी जादुई.
आणि या तोडफोडीचे काहीच आवाज येत नाहीत?”
"नाही. कारण ती काही हातोडीनं करायची तोडफोड नाही. ते कण वेगळ्या प्रकारानं हळू हळू सुटे केले जातात. अनुष्का, तू अन्नाचा
घास तोंडात घातल्यावर काय होतं माहित आहे ?...."
"काय होत?"
![]() |
| YAaa यॅऽऽ |
"आणि, एवढंच नाही काही.... ती
जीभच तुला सांगते की, तू खातेस ते गोड आहे, की आंबट की कडू ते,
... जीभ नसती तर आपल्याला काहीच चव कळली नसती."
“मग काय खाण्याची मजा?”
![]() |
Oral Cavity & Pharynx
तोंडाची पोकळी व घसा
|
“मी पण घशात ढकलणार” साया म्हणाली.
"मग काय होतं आबा? तो पोटात जाऊन पडतो?" अनुष्काची उत्सुकता वाढली...
"धप्पकन् पडत नाही काही. तुझ्या घशापासून पोटापर्यंत एक नळी असते. त्या नळीला म्हणतात अन्ननलिका (food pipe). तिच्यातून तो घास अलगत जाऊन पडतो तुझ्या पोटात. ... पोट म्हणजे, पोटातल्या एका छोट्या पिशवीत... जठरामधे (Stomach) ... त्या पिशवीचं खालचं तोंड तात्पुरतं
बंद असतं. ... तुझ्या जेवणातले ते सगळे घास तिथे तीन साडेतीन तास असतात ... तिथे
जठराच्या हालचालीमुळे अन्न चांगलं घुसळलं जातं आणि जठरातले पाचक रस अन्नात चांगले मिसळतात.
... अन्नाचं अजून पचन होण्यासाठी...”
![]() |
| Oesophagus & Stomach अन्ननलिका व जठर |
"मग?"
“साधारण तीन तासांनंतर
जठराचं दुसरं तोंड उघडतं आणि आणखी पातळ झालेल्या आणि अर्धवट पचलेल्या
अन्नाचा पुढच्या नळीत पुढचा प्रवास सुरु होतो. त्या नळीला म्हणतात लहान आतडं (Small intestine). ... आणि अनुष्का, तुला माहित आहे का की हे लहान
आतडं किती लांब असतं ते ... २२ फूट ... म्हणजे तुझ्या हॉलच्या ह्या टोकापासून, त्या
टोकापर्यंत..."
“अबबं! माझ्या या एवढ्याशा पोटात?"
“ते छान गुंडाळी करून ठेवलेलं असतं. ... शिवाय आपल्या पोटात जठराच्या
वरती अजून एक यकृत (Liver - लिव्हर)
नावाचा आणि जठराच्या मागे स्वादुपिंड (Pancreas - पॅन्क्रिआज् ) नावाचा अवयव असतो ...”
"बाप रे! एवढं सगळं माझ्या पोटात असतं ?" अनुष्काचे डोळे आश्चर्याने विस्फारले
..
“मग पुढं?”
“दोन्हीतूनही वेगवेगळे पाचक रस जठरातून लहान
आतड्यात येणार्या अन्नात मिसळले जातात ... शिवाय लहान आतड्यातला पाचक रस असतोच...
अन्नाचे अजून जास्त पचन होण्यासाठी."
“मग?”
"मग लहान
आतड्याच्या पुढच्या भागात हे पचलेलं अन्न रक्तात शोषलं जातं ... मगाशी तू विचारलंस ना, अन्न रक्तात का शोषलं जायला पाहिजे?"
"हो. का शोषलं जायला पाहिजे?"
"तुला माहिती आहे की रक्त सगळ्या शरीरात फिरतं. त्यामुळे अन्नाचे हे कण रक्तातून संपूर्ण शरीरात, हात, पाय, डोकं कान डोळे, सगळीकडे पाठवता येतात, ... सगळ्यांची एनर्जीची, वाढीची, झीज भरून काढण्याची आणि इतर कामांची गरज भागवायला.”
"हो. का शोषलं जायला पाहिजे?"
"तुला माहिती आहे की रक्त सगळ्या शरीरात फिरतं. त्यामुळे अन्नाचे हे कण रक्तातून संपूर्ण शरीरात, हात, पाय, डोकं कान डोळे, सगळीकडे पाठवता येतात, ... सगळ्यांची एनर्जीची, वाढीची, झीज भरून काढण्याची आणि इतर कामांची गरज भागवायला.”
“वर्षं? छे छे! हा सगळा प्रवास आणि
पचन-शोषणाचं काम व्हायला फक्त 1 दिवस लागतो."
“एवढाच? हुश्श! ... झालं सगळं काम.”
“हुश्श! ... झालं काम.” साया म्हणाली.
“अजून पुरं झालं नाही काही. काम
झाल्यानंतर आवरासावरी आणि स्वच्छता करायला नको का? पचनाचं काम पूर्ण झाल्यावरही
काही न पचलेला अन्नाचा भाग आणि इतर काही टाकाऊ गोष्टी शिल्लक राहिलेल्या असतात.
त्या शरीराबाहेर टाकायला नकोत का?
“हंऽऽऽ! ...”
“शिवाय पचनासाठी इतके सगळे पाचक रस ओतले
त्यातलं बरचसं पाणी शिल्लक राहिलेलं असतं. ते वाया घालवून कसं चालेल?”
“मग काय करायचं.”
“मग हे सगळं शिल्लक राहिलेलं पुढे एका
रुंद नळीत शिरतं. ही 5 ते 5.5 फूट लांबीची नळी असते ...
तिला मोठं आतडं (Large
intestine ) म्हणतात.”
"मोठ्या आतड्यात काय होतं आबा?"
"तिथे त्यातलं बरचसं पाणी शोषून घेतलं जातं ... आणि ... उरलेला
टाकाऊ भाग शेवटच्या टोकाशी साठवला जातो. ... आणि ऽऽऽ ... अशा
दिवसभरातल्या सगळ्या जेवणांतले टाकाऊ भाग इथे साठून
राहिले कीऽऽऽ ...
... "
"की काय?"
"की अनुष्का म्हणतेऽऽऽ ... मम्मी, मम्मी ... पॉटी
आलेय..."
“हा
हा हा......”
साया आणि आरवसकट सगळे
हसायला लागले.
आणि सगळे हसताहेत हे बघून ईवा आणि निवेदही हसायला लागले.
- - - प्रदीप आबा






Very Useful,readable and understandable.
ReplyDelete