ASAE

ASAE
AnSaAaEv in Wonderland

Saturday, April 30, 2016

मॉम्मी, मी काय करू? भाग 2

मॉम्मी, मी काय करू?
भाग 2
सातव्या दिवशी अनुष्काबरोबर खेळायला अप्पू हत्ती आला. त्याच्या बरोबर ग्रोगोर वाघोबला, मंकू माकडूदादा, टुन्‌टिन हरीण, पंचरंगी पोपट, नीळू मोर, आणि फझी ससा हे सगळे जंगलातून आले. सोन्या कुत्रा आणि ब्लूमिनी मनीमाऊ हे पण आले. सगळे पार्कमधे जाऊन खूप खेळले. तो दिवस मजेत गेला. संध्याकाळी ते घरी निघाल्यावर अनुष्का म्हणाली,तुम्ही जाऊच नका. नेहमी इथंच राहा.

अप्पू म्हणाला, अगं पण घरी आमची आई वाट बघत असेल. आम्हाला आमच्या घरी जायलाच हवं.
मग रोज खेळायला माझ्याकडे या.
अप्पू म्हणाला, रोज कसं येता येईल? इतकं लांब यायला लागतं. शिवाय आम्हाला आमची कामं असतात.”
“तुम्हाला कसली कामं?”
“मला सोंडेनं गवत खायची, झाडाच्या फांद्या तोडायची, पाण्यात डुंबायची आणि अंगावर चिखल उडवून घ्यायची प्रॅक्टीस करायची असते; ग्रोगोरला आणि ब्लूमिनीला उड्या मारायची, झडप घालायची, पकडापकडीची; फझीला उड्या मारायची; टुन्‌टीनला टुण्‌ टुण्‌ उड्या मारायची, धूम पळायची प्रॅक्टीस करायची असते.” अप्पू म्हणाला.  
“मला भुंकायची, जोरात पळायची, वास ओळखायची आणि राखण करायची प्रॅक्टीस करायची असते, मंकूला लोंबकाळायची, या झाडावरून त्या झाडावर उड्या मारायची प्रॅक्टीस करायची असते.” सोन्या म्हणाला.
“मला लांब उडायची आणि फळं शोधायची आणि नीळूला पिसारा फुलवायची आणि नाचायची प्रॅक्टीस करायची असते.” पंचरंगी म्हणाला.  
“शिवाय प्रत्येकाला घरी कामं असतात. आई-डॅडीला मदत करायची असते, भावा-बहिणींशी खेळायचं असतं.” अप्पू म्हणाला.   
 “तुला नसते का कशाची प्रॅक्टीस करायची? मंकू म्हणाला.
अनुष्का म्हणाली, मला कंटाळा येतो. आणि मी वीक आहे ना!

छे छे! मला माहिती आहे तू खूप स्ट्रॉंग आहेस. पण तुला प्रॅक्टीसचा कंटाळा येतो. आणि मला हे कधी येईल, ते कधी येईल, अशी घाई होते. मला माहिती आहे, तुला खूप गोष्टी करायला आवडतात. मागे मालविका आत्या आली होती तेव्हा तू एक प्रोजेक्ट किती छान केला होतास. शिवाय तुला क्राफ्ट करायलाही आवडतं.
मला आत्ताच्या आत्ता प्रोजेक्ट करायचा आहे. मला मालविका आत्या आत्ताच्या आत्ता हवी.
बघ, अशी तू सगळ्याची घाई करतेस. नाहीतर तेच तेच करत बसतेस. मग तुला कशाची मजाच वाटत नाही. त्यापेक्षा तू या सुट्टीत काय काय करायचं हे आधी ठरव.
“मला नं, खरं, ताकद देणार्‍या परीची गरज आहे.” अनुष्का म्हणाली.
“ताकद देणारी परी?” ग्रोगोर.
“हो! तिचं नाव ’पॉवरिंग’. तिला बोलावलं की ती येते. आपण आपला प्रॉब्लेम सांगितला की ती जादूनं आपल्या अंगात शिरते आणि एक महिनाभर राहाते. मग आपल्याला रोज थोडी थोडी शक्ती येते.”
“पण तुझा प्रॉब्लेम काय आहे?” मंकू.
“मला नाही माहीत. पण माझ्या डॅडीला माहितीयै. तो म्हणतो, परी अंगात शिरल्यावर रोज 2 कप दूध, एक अंडं आणि 1 वाटी पालेभाजी खाल्ली की 1 महिन्यात शक्ती येते.”
“पण मी तर अंडं खात नाही. मी शाकाहारी आहे ना!” अप्पू आणि टुनटिन म्हणाले.
“पण अप्पू, तुला तर ताकदीची गरजच नाही. आणि अंड्याऐवजी 1 वाटी उसळ खाल्ली तरी चालते.”
“वॉव्‌ ! मग ठीक आहे.” टुनटिन.
“मी तिला उद्या सकाळी बोलावणार आहे. माझ्याकडे तिचा फोन नंबर आहे ना!”
“ओके! तू तिला उद्या बोलाव आणि तुला ताकद येतेय असं वाटलं तर आम्हालाही तिचा फोन नंबर दे.” मंकू.
“ओके! बऽऽरं. पण तुम्ही पुन्हा खेळायला कधी याल?
अप्पू हत्ती म्हणाला, पुढच्या आठवड्यात.
मग सगळे आपापल्या घरी गेले.

संध्याकाळी डॅडी घरी आल्यावर अनुष्का म्हणाली, सगळे मित्र गेले. माझ्याबरोबर खेळायला कुणीच नाही.
डॅडी म्हणाला, त्यांना आपापल्या घरी जायला नको का?

पण मला कंटाळा येतो. अप्पू म्हणाला, सुट्टीत काय काय करायचं हे आधी ठरव. मी खूप गोष्टी करायचं ठरवलं. पण मला कंटाळाच येतो आणि काही करताच येत नाही.

डॅडी म्हणाला, कारण तू दिवसभर एकच काहीतरी करत बसतेस आणि मग कंटाळतेस. तू दिवसात निरनिराळ्या गोष्टी थोडा थोडा वेळ कर. म्हणजे तू दमणार पण नाहीस आणि कंटाळणार पण नाहीस.”
“पण माझ्या अंगात शक्तीच नाहीयै ना! मी उद्या ’पॉवरिंगला’ बोलावणार आहे.”
“हंऽऽ! मला माहितीयै. तुला एक गंमत सांगू का! कुण्णाला माहीत नाही आणि तू पण कुणाला सांगू नकोस.”
“सायाला पण?”
“सायाला फक्त सांग. बाकी कुणाला नाही.”
“ओके! सांग.”

“खरं म्हणजे नंऽऽ, तुझी मॉम्मी म्हणजेच ’पॉवरिंग’. आणि तिचा तर फोन नंबर तुझ्याकडे आहेच.” 
“खंरंऽऽ?”
“मग? मी तुला खोटं सांगेन का? तीच तुला मदत करेल. पण त्यासाठी प्लॅनिंग करायला हवं. डॅडी म्हणाला.
मला नाही प्लॅनिंग करता येत.
पण तुझ्या मॉम्मीला, म्हणजे ’पॉवरिंगला’ येतं ना! तिला प्लॅनिंग करता येतं, छान आणि पौष्टीक स्वयंपाक करता येतो, तुमच्या बरोबर खेळता येतं, तुम्हाला गोष्टी सांगता येतात, तुम्हाला शिकवता येतं. तिला तर सगळंच येतं. शिवाय तुम्हाला कधी काय हवंय तेही तिला बरोब्बर कळतं. ती तुला मदत करेल! तिलाच फोन कर.
“घरातल्या घरात?”
“मग? तू आता अशीच तिच्याकडे गेलीस तर ती नेहमीची मॉम्मी असेल. पण तू तिला ’पॉवरिंग’ म्हणून फोन केलास तर ती ’पॉवरिंग’ असेल. मी पण काही काही वेळा तिला फोन करतो.”
“तू पण?” अनुष्कानं डोळे मोठ्ठे करून विचारलं.
_ _ _ * * * _ _ _ * * * _ _ _ * * * _ _ _ 


भाग 3पुढच्या शनिवारी

Saturday, April 23, 2016

मॉम्मी, मी काय करू? - भाग 1

मॉम्मी, मी काय करू?
भाग 1
उन्हाळ्याच्या सुट्टीची अनुष्का अगदी वाटच पाहात होती. बर्फ वितळला होता, थंडी पळाली होती आणि हवा ऊबदार झाली होती. उन्हाळा सुरू झाला होता. वसंत ऋतू आला होता.
झाडांना नवी पालवी आली होती, नवं गवत उगवलं होतं आणि सगळीकडे हिरवं-गार झालं होतं. सगळीकडे रंगीबेरंगी फुलं फुलली होती आणि हवेत त्यांचा वास पसरला होता. पण अजून शाळा चालू असल्यानं अनुष्काला बाहेर भटकायला आणि खेळायला मिळालं नव्हतं.
शिवाय इंडियातून आजी-आबाही आले होते. पण अनुष्काला त्यांच्याबरोबर गप्पा मारायला, खेळायला आणि त्यांच्याकडून लाड करून घ्यायला पण वेळ मिळाला नव्हता.

पण मंगळवारी शाळा संपली आणि बुधवारपासून अनुष्काची उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. हे ऽऽऽ आता मज्जाच मज्जा! 


एक दिवस अनुष्कानं आजी-आबाकडून खूप लाड करून घेतले. ती सारखी आबाच्या मागे मागे धावली, त्याच्या पाठीवर बसून घोडा-घोडा खेळली आणि त्याच्याकडून गोष्टी ऐकल्या. तिनं आजीकडून भरवून घेतलं आणि तिच्या कुशीत झोपली.   







एक दिवस तिनं लॅपटॉपवर गोष्टींचे व्हीडिओ बघण्यात आणि गाणी ऐकण्यात आणि कार्टून नेटवर्कवर कार्टून बघण्यात घालवला. 







एक दिवस, मी वर्षभर खूऽऽऽप अभ्यास केला नंऽऽ, माझ्या मऊ मेंदूला मुंग्या आल्या, आता मी दमले, कोमेजले’, असं म्हणत तिनं लोळून विश्रांती घेण्यात घालवला.







एक दिवस तिनं ’सिक’ पडून बघितलं. तिला बारीक ताप वाटला, थोडी कसकस वाटली, सर्दीनं डोकं जऽऽड झाल्यासारखं वाटलं, तोंडाची चव गेली, थोडा खोकला वाटला आणि मळमळतंय्‍ गरगरतंय्‍ असं वाटलं.  







एक दिवस तिला खूप कंटाळा आला. मग तिनं तिची धाकटी बहीण सायाची विनाकारण खोडी काढली, तिला त्रास दिला आणि मग तिनंच मला ढकललं म्हणून कांगावा केला. 






एक दिवस तिला काहीच पटेना, काहीच तिच्या मनास येईना, कोणाचंच आपल्याकडे लक्ष नाही, असं म्हणून तिनं उगीचच चिडचीड आणि रडारड केली.  






मग सातव्या दिवशी तिनं मॉम्मीच्या मागे दिवसभर खूप भुणभूण केली, मॉम्मी, मी बोअर झाले. आता मी काय करू?




मॉम्मी म्हणाली, अगं अनुष्का, आबांनी तुझ्यासाठी नवी पुस्तकं आणली आहेत, ती वाच. किंवा चित्रं काढ.
डॅडी म्हणाला, नवी गाणी ऐक किंवा सिंथ’ वाजव.
आबा म्हणाले, आपण पोहायला जाऊया का?
आजी म्हणाली, तू सायाची दीदी आहेस ना? मग तिच्याबरोबर खेळ, तिला काहीतरी शिकव.

  


मग एक दिवस दिवसभर अनुष्कानं पुस्तक वाचलं आणि तिला कंटाळा आला.ती म्हणाली, ही पुस्तकंच चांगली नाहीत. काही पुस्तकांत चित्रंच नाहीत. ज्यांत आहेत त्यांतली चित्रंच चांगली नाहीत. माझ्या आवडीच्या गोष्टीच त्यांत नाहीत.




दुसर्‍या दिवशी दिवसभर तिनं चित्रं काढली आणि ती मॉम्मीला म्हणाली, मॉम्मी, माझी चित्रं चांगली येणारच नाहीत. माझा कागद, ब्रश आणि रंग भिकार आहेत”
“का? चांगले तर आहेत.”
“मला तुझा कॅनव्हास आणि तुझे रंग हवेत.   
मॉम्मी म्हणाली, मी आधी हेच ब्रश आणि रंग वापरत होते. मला आधी चित्रं चांगली काढता यायला लागली आणि मग मला आता हा कॅनव्हास आणि हे रंग मिळाले.”  

तिसर्‍या दिवशी दिवसभर तिन सिंथ’ वाजवला आणि ती डॅडीला म्हणाली, डॅडी, या सिंथमधून चांगला आवाजच येत नाही, माझ्या आवडीची गाणीच त्यात नाहीत.
डॅडी म्हणाला, गाणी सिंथमधे नसतात. ती 
आपल्या डोक्यात असतात. ती वाजवायला शिकायला हवं. त्याला रोज प्रॅक्टीस करायला पाहिजे, म्हणजे आपल्या डोक्यातलं, आपल्याला हवं ते गाणं त्यातून वाजवता येईल.

चौथ्या दिवशी ती आबांबरोबर पोहायला गेली. आल्यावर आबा म्हणाले, काय? मजा आली की नाही? तुला पाण्यात खेळायला खूप आवडतं ना?
अनुष्का म्हणाली, पण माझं डोकंच भिजतं आणि पाय वरच येत नाहीत.
आबा म्हणाले, आपण रोज पोहायला जाऊ. तू रोज पाय मारलेस की चार दिवसांत ते वर यायला लागतील आणि रोज हात मारलेस की पुढे जाशील. म्हणजे पोहायला आलंच.

पाचव्या दिवशी तिनं सायाबरोबर खेळण्याचा प्रयत्न केला आणि ती म्हणाली, आजी, साया सारखी माझ्याशी भांडते. माझ्या हातातून खेळ हिसकावून घेते.
आजी म्हणाली अगं, ती अजून लहान आहे. तिला कळत नाही. पण तू मोठी, तिची दीदी आहेस ना, मग तिच्या कलानं खेळ.
अनुष्का म्हणाली, कलानं म्हणजे काय? आणि मी नेहमीच मोठी असणार आणि ती छोटीच राहाणार.

मग सहाव्या दिवशी तिनं मॉम्मीच्या मागे पुन्हा दिवसभर खूप भुणभूण केली, मॉम्मी, आता मी काय करू?

मॉम्मी वैतागून म्हणाली, जा तर मग आता शाळेत.
अनुष्का म्हणाली,पण शाळेला तर अजून २ महिने सुट्टी! मग आता मी काय करू? आता मी बोअर झाले.
_ _ _ * * * _ _ _ * * * _ _ _ * * * _ _ _ 

भाग 2पुढच्या शनिवारी 







Saturday, April 16, 2016

जुनी कविता

जुनी कविता - दिशा

सूर्य उगवतो जिकडे, तिकडे तोंड करून उभे रहा
तोंडाकडची पूर्व दिशा रे, पश्चिम  तुमच्या पाठी पहा
उजव्या हाताकडची बाजू, दक्षिण म्हणती दिशेस त्या
डाव्या हाताकडची बाजू, उत्तर देती नाम तया
पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, चार दिशा या मुख्य खर्‍या
धरा नीट ध्यानात मुलांनो, पडतील तुमच्या कामी बर्‍या


सूर्य उगवतो जिकडे, तिकडे तोंड करून उभे रहा



तोंडाकडची पूर्व दिशा रे, पश्चिम  तुमच्या पाठी पहा






उजव्या हाताकडची बाजू, दक्षिण म्हणती दिशेस त्या

डाव्या हाताकडची बाजू, उत्तर देती नाम तया






पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, चार दिशा या मुख्य खर्‍या
धरा नीट ध्यानात मुलांनो, पडतील तुमच्या कामी बर्‍या







प्रदीप आबा
(माझ्या वडिलांकडून शिकलेली कविता)






Tuesday, April 12, 2016

Anushka Rides a Bicycle

Anushka Rides a Bicycle
One day Anushka was very bored. 
It was Sunday and there was nobody to play with. She was tired of reading a book and watching TV. She was even tired of playing Bowling-Game on computer.
She was just thinking of going to Mama and doing some “Bhun-bhun” and the phone rang.

He was Appu Hatti (Appu – the Elephant).
“Anushka, what are you doing? Can you come to my house?”
“Oh! I would love to. But you live far away. How can I come?” said Anushka.
“Why? You can come on your new bicycle.”
“Oh! But I cannot ride it. And my Dad is also not here to push me.”
“O.K. I will come and we will ride a bicycle.”

After some time Appu Hatti came to Anushka’s house and he, Anushka and Saya went to the playground. Anushka took her new bicycle with her. 


In the ground, Saya tried to climb on Appu’s back. But he was very, very big. She couldn’t climb on his back. So Appu gently lifted her with his trunk and kept her on his back. 

Then he gave her a long ride. She was very happy. She was clapping her hands and was laughing.

Anushka Climbed on her bicycle and was waiting. 
“Anushka, why are you not riding the bicycle?” Appu asked.
“I am waiting for you to push me.” Anushka said.
“Why? You will not fall down. There are two supporting side-wheels. You just paddle it.”
“Yes. But, you know, my legs are weak. I cannot paddle the cycle.”

“You can walk and jump and can do all other things. And you climbed a hill when you went to trip.”
“But our Teacher was with me.”
“But you climbed on your own.”
“Yes. But I am weak. My legs are weak.”
“But I know you are very strong.”
“My Dad is also not here to push me.”
“Oh, Anushka! But you don’t need your Dad to push you. He told me you are the strongest girl he know.”
“Why he said that?”
“I don’t know. But he said, she will know it and understand it one day.”
“But, … I get tired early.”
“And your Mama told me once that you were the bravest girl she knew. She must be right, because she knows you since birth.”     
“But, …”
“Why don’t you just try?”
“You really think I will be able to paddle the cycle?”
“Yes, of course! Why not? … and you have a strong will power. You try and then practice, practice and practice.”

Saya was also waiting for her Didi to ride the bicycle.

Then Anushka started to paddle the cycle and Wow! … She could do it. Yes!!! … And then ZZUUuuuuuuK~~~~~~

It was very easy. Once she started to paddle the cycle she could do it very fast. And fast and fast she went. Yes!!!

Saya was too small to ride a bicycle. So she ran behind Anushka. She was also learning to run. But once she started, it was very easy. She also ran fast and fast and fast.
       
“Let me draw your picture, just as you have drawn me as Multicolor Appu.” Appu Hatti said.
Then, taking a brush in his long trunk, Appu drew Anushka as a Winner in a Cycle Race.





After some days, Anushka and Saya went to Appu Hatti’s Home. They went on bicycle. Appu was surprised.

“You came all the way here, paddling a cycle?” Appu asked.
“Yes, I can do it easily. Thanks Appu! … Your picture, ‘Anushka Wins a Cycle Race’, always reminds me that I am strong and I can do anything. Thanks again!!”

“Oh! But really I am thankful to YOU for drawing my picture as ‘Multicolor Appu Hatti’. You taught me to be proud of what you have and what you are.” Appu said. 
Rajan Aaba
---   ***   ---   ***   ---